धूक्यामध्ये हरवलेला काळदुर्ग
🚩🚩जय शिवराय🚩🚩
नमस्कार मित्रांनो,
आम्ही पालघर या गावातले, फक्त सुट्टीमध्ये गावात आंबे खायला जायचे एवढेच आम्हाला माहिती. पूर्वी त्यावर कधी आपल्या आजू बाजूचा भौगोलिक परिसर किंवा इतिहासिक विषयावर कधीही अभ्यास केला नाही.
सध्या गेले दीड वर्ष सपाटून गड भ्रमंती चालू आहे तेव्हा प्रत्येक जागेचे, किल्ल्याचे, खिंडीचे महत्त्व काय हे अभ्यासातून कळत आहे.
असो, वाघोबा खिंडीत वाघोबा मंदिर आहे, तिथे पावसाळ्यात धबधबा असतो, या व्यतिरिक्त तिथे किल्ला सदृश्य जागा आहे हे माहिती नव्हते.
मंदिरा मध्ये आम्ही नेहमी थांबतो, तेव्हा काही मंडळी डोंगरावर जाताना दिसले तेव्हा हळू हळू कळले की काळ दुर्ग नावाचा टेहळणीचा बुरुज वजा किल्ला आहे ते.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही ठरवले की किल्ल्यावर जायचे, जाऊन आलो, फोटो काढले, व्हिडिओ काढले पण बाकी प्रोजेक्ट्स हातात असल्यामुळे प्रसारित करता आले नाहीत, थोडा उशीर झाला.
एक महत्वाची माहिती, ह्या किल्ल्याची कोणतीही माहिती न घेता अचानक ठरलेला आमचा ट्रेक आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केला. पण नावात गल्लत झाली, आम्हाला वाटले ह्या किल्ल्याचे नाव काल दुर्ग असे आहे पण, व्हिडिओ YouTube वर publish केल्या नंतर लगेच दुर्ग पंढरी संस्थेच्या कार्यकर्त्या कू. मानसी शिरगावकर यांनी लगेच झालेली चूक निदर्शनास आणून दिली आणि लागलीच मी दुरुस्ती पण केली. पण व्हिडिओ मध्ये दुरुस्ती करणे शक्य नाही म्हणून ती तशीच राहिली. खरे नाव काळ दुर्ग असे आहे ह्याची नोंद घ्यावी.
काळ दुर्ग, वाघोबा खिंड ही पालघर वरून मनोर हायवे कडे जाताना 5-7 km अंतरावर आहे, इथे येण्याकरता भरपूर वाहने उपलब्ध आहेत बहुदा 15-20 रुपयांमध्ये सार्वजनिक वाहन उपलब्ध होईल.
मुंबई कडून किंवा दिव्यावरून डायरेक्ट ट्रेन उपलब्ध आहेत पालघरला येण्यासाठी, अगदी 20-30 रुपयांमध्ये १-१.५ तासात आपण पालघरला पोहोचतो.
पायथ्यापासून 1 तासांमध्ये डोंगर सर होतो. समोर विहंगम दृश्य दिसते. आजूबाजूला अशेरी गड, असावा किल्ला, कोहोज किल्ला, तांदुळवाडी किल्ला, महालक्ष्मी डोंगर सहज दृष्ठीक्षेपात येतात. भर दिवाळी मध्या थोडी थंडी होती, विशेष किल्ल्यावर धुक्याची चादर पसरली होती, ते दृश्य छान होते.
हा किल्ला मी नवख्या ट्रेकर मंडळींना शिफारस करीन, छोटा ट्रेक आहे पण चढ medium level आहे जंगलात भटकणे नाही होणार, सरळ मोठा trail असल्यामुळे, काही हरविण्याचा धोका नाही, कमी खर्चिक आणि भन्नाट व्ह्यू देणारा असा आहे.
किल्ल्यावर जाताना पाणी आणि खाण्याच्या वस्तू घेणं हे उत्तम कारण जंगलात कोणतेही दुकान, हॉटेल उपलब्ध नाही.
गडावर 3-4 पाण्याच्या टाक्या आहेत पण पाणी पिण्याजोगे नाही आहे ह्याची नोंद घ्यावी.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण खरी परिस्थिती अनुभवायची असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.
YouTube:
https://youtu.be/9VWce8Pq0AY
Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
माझे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp number: ९९६७१५२९३८
जर आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता तर मग खालील दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube वर उपलब्ध आहेत.
कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा