पोस्ट्स

आजची भटकंती आहे ती दुर्ग त्रिकुटांची माहुलीगड, भंडारगड आणि पळसगड.

नमस्कार मंडळी, आजची भटकंती आहे ती दुर्ग त्रिकुटांची माहुलीगड, भंडारगड आणि पळसगड. या ट्रेकचे आयोजन श्री दीपक शेळके यांनी "दुर्ग वाटाड्या" सफर सह्याद्रीची या पुण्याच्या संस्थेने केले होते. ते पुण्यावरून नेहमी प्रमाणे त्यांची 20-22 जणांची टीम घेऊन आले होते, आम्ही त्यांना मुंबईतून 6 आणि वसईतून 4 जणांनी जॉईन केले होते. बोरिवली वरून 3.50 ची पहिली लोकल आणि पुढे दादर वरून 4.37 ची कासाऱ्यची पहिली लोकल पकडुन आम्ही 6.30 पर्यंत आसनगाव इथे पोहोचलो. पुढे 250 रुपये रिक्षाला ( रिक्षात 3 जण फक्त बसवतात) मोजून माहुली गडाच्या पायथ्याला असणाऱ्या माहुली गावात पोहोचलो. पुणे आणि वसई टीम पहाटे आले असल्यामुळे ते पुढे निघून गेले होते. आम्ही पण नाश्ता करून ट्रेक चालू केला, नाश्त्यासाठी भूमिका ढाबा 8766590580 यांना संपर्क करा. वाटेतच गडाच्या मुख्य प्रवेद्वराजवळ शाळेपुढे यांचे हॉटेल आहे. वन विभागाची माणशी 30 रुपये अशी पावती फाडली आणि ट्रेक चालू केला. पुढे संपूर्ण वाट मळलेली असल्याकारणाने काही चिंता नव्हती, अर्धा डोंगर गर्द झाडीने बहरलेला आहे त्यामुळे उन्हाचा त्रास पण नाही होत. डोंगराचा खडा चढ मग पठार मग...

गोरखगड एक थरारक अनुभव, 80°अंशातील कातळातील कोरीव पायऱ्या, 2137 फूट उंच असा टेहाळणीचा बुरुज.

गोरखगड एक थरारक अनुभव, 80°अंशातील कातळातील कोरीव पायऱ्या, 2137 फूट उंच असा टेहाळणीचा बुरुज. गोरखगड किंवा गोरक्षगड असे नाव जरी असले तरी हा एक टेहाळणी साठी वापरला गेलेला बुरुज आहे. हा गड सातवाहन काळापासून घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे, प्रामुख्याने कोकण आणि सातवाहन कालीन राजधानी पैठण यांना जोडणारा दुआ जवळच असलेल्या नाणे घाटातूनच जात असे. गडावर भग्न अशा भरपूर वास्तू आहेत पणं त्यातील प्रामुख्याने एक महादेव / शनी मंदिराची वास्तू विखुरलेल्या अवस्थेत आजही दिसते. हा गड उंचीवर असल्याकारणाने गडावर भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत जेणेकरून उन्हाळ्यात पण इथे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून, बहुदा काही टाक्या अन्न धान्य साठवण्यासाठी, घाट वाटेतील कराचा खजिना ठेवण्यासाठी पण वापर करत असावे असा अंदाज आहे. गडावर काही शिल्प, शिलालेख, आणि गडावर सर्वोच्च ठिकाणी जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या अशा गोष्टी पण आहेत. हा ट्रेक आम्ही सार्वजनिक वाहनाचा वापर करून केला होता, ट्रेकला येणाऱ्या सदस्य संख्या 10, या TTMM ट्रेकची आयोजन वडोदरा येथील गौरव वैशंपायन यांनी केले होते. मी बोरिवली वरून पहाटेची पहिली लोकल ...

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे नमस्कार मंडळी, हा लेख मागच्या तांदूळवाडी गडाचा क्रमशः भाग आहे, जर आपण तो लेख वाचला नसेल तर वाचून घ्यावा. गडावरून आम्ही उत्तरेच्या मार्गाने खाली उतरलो, हा थोडाफार दगडाने बनवलेला पायरी मार्ग आहे. वाटेत फार काटेरी झाडी झुडपे आहेत याची नोंद घ्यावी. ह्या वाटेने तुम्ही अर्धा गड उतरलात की परत तांदूळवाडी गावात किंवा लालठाणे गावात जाऊ शकता, खाली तसे बोर्ड लिहिले आहेत, वाटेत ऑईल पैंटने खुणा केल्या आहेत त्या बघून पायवाट धरावी. गड उतरल्यानंतर, गावा जवळ आपल्यावर उजव्या बाजूला भाला मोठा धबधबा दिसतो त्याचा स्पष्ट असा आवाज आधीच कानावर येतो. आम्ही गावाकडची पायवाट सोडून, धबधबा पहण्यासाठी वळलो. धबधबा हा भाला मोठा जवळ जवळ शे दीडशे फूट उंच असा आहे पण तो झाडं झुडपात लपलेला आहे. गड उतरताना पाऊस चालू होता, धबधबा उफाळून आला होता, जोर एवढा होता की मोबाईल, कॅमेरा काहीच शूट करू शकत नव्हतो. कसे बसे फोटो व्हिडिओ काढले, पाण्याचा आनंद मिळवला आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. आम्ही हा ट्रेक TTMM तत्त्वावर केला होता, आम्हाला माणशी फक्त 90 रुपये खर्च झाला....

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची नमस्कार मंडळी, तांदूळवाडी गड हा तसा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा, मुंबई जवळ, अगदी हाकेच्या अंतरावरच आहे तो, कमी खर्चिक बाब असा अगदी 100 रुपयात आपला प्रवास खर्च भागून जातो. सकाळच्या 5.45 आणि 6 अशा लागोपाठ दोन लोकल गाड्या डहाणू कडे जातात, ज्या सफाळ्याला 7 वाजता पोहोचतात. सफाळा स्टेशन बाहेर पूर्वेकडे एसटी बस उभीच असते, एसटी आपल्याला 20 रुपयात हिरव्यागार छोट्याश्या घाटाची सफर घडऊन थेट गडाच्या पायथ्याशी सोडते. घाटातून गड दिसतो पण तो धुक्यात माखलेल्या अवस्थेत असतो. एक अद्भुत असा नजारा प्रवास करताना दिसतो. तांदूळवाडी स्टॉप वर उतरल्यावर प्रशस्त असा वाहनतळ जिल्हा परिषदेने केला आहे, तिथे पार्किंग फुकट आहे मग चिंता नाही. पार्किंग समोरच काही दुकाने आहेत मग अगदी निर्धास्त पणे गाडी ठेऊन जाऊ शकता. तांदूळवाडी गड तसा लहानच पण चहू बाजूने गर्द अशा सह्याद्रीतील झाडं झुडपांनी वेढलेला आहे. मुख्य गडावर जायला आपल्याला एक दोन छोटे डोंगर पार करावे लागतात. गड परिसरात भरपूर तलाव, धरणे, गर्द झाडी, खाडी परिसर, खाजणाचा परिसर असे सगळे पक्षी आणि वन्य प्राण्यांना उपयुक्त असा पोशिंदा असल्याम...

मी पावसाळ्यात अनुभवलेला अभूतपूर्व असा माळशेज घाट

मी पावसाळ्यात अनुभवलेला अभूतपूर्व असा माळशेज घाट नमस्कार मंडळी, पावसाची चाहूल लागली की धरणी माता जुनी कापड बदलून हिरवा शालू नेसते, ती खुलून येते, तिच्या अंगा खांद्यावर लव्हाळी लवलऊ लागतात...... जास्त काही लिहिण्यापेक्षा ज्येष्ठ कवियात्री शांता शेळके बाईंनी लिहिलेली समर्पक कविताच बघुयात, आला पाऊस मातीच्या वासांत ग मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग आभाळात आले, काळे काळे ढग धारा कोसळल्या, निवे तगमग धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥ कोसळल्या कश्या, सरीवर सरी थेंब थेंब करी नाच पाण्यावरी लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥ लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली वारा दंगा करी, जुइ शहारली, चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥ झाडांवरी मुके, पाखरांचे थवे वीज लालनिळी, कशी नाचे लवे तेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥ वीज कडाडतां, भय दाटे उरीं एकलि मी इथे, सखा राहे दुरी मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग ॥ ५ ॥ – शांता शेळके  या पावसासाठी माझे शब्द अपुरे पडतील असा साग्ररस या कवितेतून प्रतीत होतो. महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण म्हणजे भटक्यांची पंढरी. निसर्गाची हिरवाई, काळे सफेद ढग, धुके, काळे शार असे डोंगर, आणि त्या वरतून...

श्री केदारनाथ यात्रा भाग 1

नमस्कार मंडळी, श्री केदारनाथ यात्रा भाग 1 मे महिन्याच्या शेवटीआम्ही केदारनाथ यात्रेला गेलो होतो, त्याचे व्हिडिओ पोस्ट केले होते पण काही कारणास्तव फोटो पोस्ट करायचे राहून गेले होते. केदारनाथ ही टूर आम्ही श्री दीपक शेळके पुणे आमचे ट्रेकर मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. टूरची पूर्ण आखणी, नियोजन, एजंट, हॉटेल ही सगळी माहिती त्यांनी पुरविली होती, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार, त्याच माहितीच्या जोरावर आम्ही आमची TTMM टूरची आखणी केली होती. माहिती मिळाल्या प्रमाणे आम्ही डेहराडून एक्स्प्रेस किंवा हरिद्वार एक्स्प्रेस हीचे तिकीट 4 महिने आधीच बुक केले होते, तरी आमची 2 तिकीट RAC राहिली होती. म्हणूनच आपण सगळ्यात आधी ट्रेन तिकीट बुक करणे गरजेचे आहे. ज्या दिवशी (४ महिने आधी) सकाळी 8 वाजता तिकीट ऑनलाईन irctc च्या वेबसाईट किंवा ॲप वर उघडतात तेव्हा अवघ्या 5 ते 10 मिनिटात सगळी तिकीटे बुक होऊन संपून जातात याची नोंद घ्यावी. त्यामुळेच सगळ्यात आधी ट्रेन तिकीट बुक करा  बांद्रा ते हरिद्वार हा पल्ला पार करायला ट्रेनला 31 तास लागतात. तेव्हा आपण हा प्रवास ग्रूपने केलेलाच बरा, जर आपण एकटे गोलो तर फार प...

गोवर्धन इको वीलेज, गलतारे, वाडा, पालघर

नमस्कार मंडळी, आज आपण वेगळ्याच ठिकाणाला भेट देणार आहोत. Iskcon यांचे गोवर्धन इको विलेज ही आध्यात्म आणि पर्यटन यांना जोड देणारी संकल्पना काही वर्षांपूर्वी नावारूपाला आली, ही वास्तू 100 एकर जागेत पसरलेली आहे भरपूर मंदिरांची शृंखला, जंगल, नदी, विविध प्रकारची जंगली आणि शोभेची फुलझाडे, हॉटेल, योग, मेडिटेशन, आयुर्वेद या सर्वांचा मिलाप आढळतो आणि याच मुले तूर्त घडीला भरपूर प्रसिद्धीच्या झोतात आहे. या मंदिराच्या शृंखला बघण्यासाठी उभ्या महाराष्ट्रातूनच नाही तर जवळ पास असलेल्या राज्यातून देखील भाविक भेट देत असतात. सर्वप्रथम ही जागा पालघर जिल्ह्यात, गलतारे गावात, हमरापुर वाडा या तालुक्यात येते. मुंबई पासून अवघ्या 90 km अंतरावर आहे तर पालघर पासून 33 km अंतरावर आहे. इथे येण्यासाठी एसटी बसचा पर्याय सुधा उपलब्ध आहे, सकाळी 7 च्या दरम्यान पालघर गलतारे कल्याण अशी बस उपलब्ध आहे, हीच बस दुपारी 2च्या सुमारास परत फिरते. जर ही बस चुकली तर भरपूर एसटी बस आपल्याला हमरापुर हायवे ला सोडतात पुढे रिक्षा उपलब्ध आहेत. इथे प्रशस्थ असे फ्री पार्किंग उपलब्ध आहे, त्यामुळे चिंता नाही. इथे आल्या आल्या आपल्याला प्रथम खिचडीचा...