श्री क्षेत्र भिमाशंकर, कर्जत, खांडस, गणेश घाट मार्गे घाट वाट ट्रेक
नमस्कार मंडळी🙏
हर हर महादेव, जय शिवशंकर
हा ट्रेक आम्ही Simple Lifestyle Vlogs यांच्या "बोरिवली हायकर्स" या संघटनेने TTMM तत्वावर केला, वाजवी खर्चात म्हणजे अवघ्या २६७ रूपयात हा ट्रेक झाला, बोरिवली वरून सलग २५ तास प्रवास, ४०९२५ पावले आणि २८.६ किलोमीटर ची चाल असा भन्नाट होता.
या प्रवासात ९ ट्रेक मेंबर्स होते, काही जुने तर काही नवे, सगळे मुंबईतून वेगवेळ्या ठिकाणा वरून आले होते. पण सगळ्यांची साथ महत्वाची होती. सगळ्यांनी न डगमगता हा कठीण असा ट्रेक रेकॉर्ड तोड टाईम आणि खर्चात पूर्ण केला हे महत्वाचे.
TTMM या तत्वात फार अडचणी असतात, खर्चाचे बजेट कमी असते, ट्रेक फुकट असतो म्हणून लोक ऐन वेळेवर टांग पण देतात. पण मुश्किल तिथे होते जिथे आपण खाजगी वाहन बुक करतो आणि जर कोणी आले नाही तर भुर्दंड आपल्याला पडतो. असो पण यावरही आपण तोडगा काढला आहे, चिंता नसावी. यापुढे आपण तो दोष दूर करून प्रवास सुखाचा करू.
आम्ही ९ जण होते म्हणून दोन खाजगी गाड्या केल्या आणि माणशी खर्च विभागून घेतला त्यामुळे बरे झाले.
पार्किंग साठी आम्हाला पैसे मोजावे लागले नाहीतर अगदी शेवटी पार्किंग फुकट होते याची नोंद घ्यावी.
सह्याद्रीतलं सर्वकालीन आवडतं ठिकाण म्हणजे पावसाळ्यातील "भीमाशंकर"
ऊंची - ३२९६ फूट, ११०० मीटर
विस्तीर्ण परिसर, चौफेर घनगर्द जंगल, आल्हाददायक व प्रसन्न वातावरण, विविध पक्षी-वन्यजीवांचं वास्तव्य अन् भटकंतीयुक्त उत्तमोत्तम डोंगरमाथे.
भीमा नदीचा उगमही याच भीमाशंकर परिसरातला आहे.
सोबतीला पदरगड, तुंगी किल्ला, कोथळीगड, सिद्धगड, गोरखगड तर, पूर्वेला भोरगिरी किल्ला हा दिमाखात उभे आहेत.
महत्त्वाचं म्हणजे भारतातील बारा व महाराष्ट्रातील पाच ज्योतीर्लिंगापैकी एक स्थान या डोंगरमाथ्यावर आहे.
पुरातन दंतकथेनुसार,
या परिसरातल्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी महादेवाने भीमरुपी अवतार धारण केला. मग युद्धात राक्षसाचा पराभव केल्यानंतर भक्तगणांच्या इच्छेनुसार महादेवाने इथेचं वास्तव्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या स्थानास भीमाशंकर संबोधले जात असल्याची अख्यायिका आहे.
भीमाशंकरचं वैशिष्ट्य म्हणजे, राष्ट्रीय प्राणी शेकरू किंवा मलबार जायंट स्क्विरल दिसण्याचं कदाचित हे एकमेव ठिकाण आहे. येथील जंगलात साधारण ३ फूट लांबीचा शेकरू हा खारीसारखा दिसणारा प्राणी झाडांवर भटकत असतो. हा प्राणी आशियातली सर्वात मोठी खार म्हणून ओळखला जातो. कधीकाळी इथले घनगर्द जंगल भारतातलं मोठं जंगल म्हणून प्रसिद्ध होतं. हा संपूर्ण परिसर वनक्षेत्र राखीव म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे इथले जंगल अद्यापपर्यंत बऱ्यापैकी घनगर्द आहे.
जंगलात असताना, विविध प्रकारचे पक्षी, लंगूर आणि ठिपकेदार हरणे, रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आढळतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे जंगलातून चालताना विविध पक्षी आणि प्राणी सतत सुमधुर असा कल्ला करत असतात. कान सुखावून जातात.
भीमाशंकर ट्रेकसाठी घाट मार्ग -
इथे ट्रेकिंगला जाण्यासाठी चारही बाजूंनी अनेक घाटवाटा उपलब्ध आहेत. खास करुन पावसाळ्यात आणि त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत इथली भटकंती अतिशय आनंददायी व निसर्गरम्य असते. पुणे, अहमदनगर, नाशिक, मुंबई, ठाणे या शहरांपासून भिमाशंकर परिसराला सहज सोपा अँक्सेस आहे. त्यामुळे तिथून कुठल्याही मार्गाने पायथ्याच्या गावात पोहोचायला ३ ते ४ तास पुरेसे असतात. या ठिकाणी मुक्कामासाठी धर्मशाळा व हॉटेल्सही आहेत.
महत्त्वाचे घाट मार्ग -
१) शिडी घाटमार्ग,
२) गणपती (गणेश) घाटमार्ग,
३) रानशिळ घाटमार्ग,
४) बैल घाटमार्ग,
५) आहूपे घाटमार्ग,
६) भोरगिरी घाटमार्ग,
७) कौल्याचा घाटमार्ग (कोथळीगड ते भीमाशंकर),
८) लोणावळा (भीमाशंकर वांद्रेखिंड मार्ग),
९) वाजंत्री घाट सोपा मार्ग - राजगुरुनगरहून भोरगिरी गावापर्यंत जात येथून पश्चिमेकडे भीमाशंकर माथ्यावर चढाई करता येते. सुस्पष्ट जंगलवाट चढाईचा भार हलका करते..
कसदार चढाईसाठी - शिडीघाट, कौल्याचा घाटमार्ग, लोणावळा-भिमाशंकर हे मार्ग भन्नाट आहेत.
यात, आम्ही - १६/०७/२०२३ रविवार, कर्जत ते खांडस ते पदरवादी ते गणेशघाट ते भिमाशंकर आणि परतीचा प्रवास त्याच मार्गाने केला.
खांडस हे भीमाशंकर गणेशघाट ट्रेकसाठी पायथ्याचे गाव आहे. खांडस गाव ओलांडून सुमारे १-१.५ किलो मीटर गेल्यावर तुम्हाला गणेश मंदिर लागते हा रस्ता सरळ घेऊन गणेश घाटाच्या पायथ्याच्या पदरवाडी पर्यंत जातो.
वाटेत भरपूर छोटे मोठे धबधबे लागतात, हा रस्ता सरळसोट आहे, वाटेत दोन्ही बाजूला दगडांची रास रचली आहे त्यामुळे रस्ता चुकणे असे होणार नाही किंवा वाटाड्या गरजेचा नाही. पुढे उजव्या हाताला पदरगडाचा मनमोहक धुक्यात लपलेला सुळका दिसतो मन प्रसन्न होते त्यालाच वळसा घालून आपण पुढे मार्गस्थ होतो.
पदर गड उजव्या बाजूला ठेऊन डाव्या बाजूला बघितले तर शिडीची वाट असा भला मोठा डोंगर लागतो, तो डोंगर अदभूत आहे, पाऊस पडला की संपूर्ण डोंगरावर धबधबे चालू होतात. अगदी मनमोहक असे दृश्य पाहून सगळा क्षीण दूर होतो. तेव्हा मी आपल्याला सांगेन ५ मिनिट वेळ काढून इथे भेट द्या.
पुढे थोडे चालल्यावर वाटेत सुंदर असा भाला मोठा धबधबा लागतो तिथे थोडी विश्रांती घेतली आणि पुढे मार्गस्थ झालो.
पुढे थोडे गेल्यानंतर पदरवाडी गाव लागते. इथे भीमाशंकर अभयारण्य वन खात्याची चौकी आहे तिथे माणशी ६० रुपये आणि जर शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी असाल तर ३० रुपये असे तिकीट लागते.
इथे भरपूर गावकरी हॉटेल उद्योग करतात, रहायला, खायला उत्तम अशा सोयी आहेत.
इथे विश्रांती घेऊ शकता. आम्ही वेळ न दवडता पुढे मार्गस्थ झालो.
पुढे, १ ते २ तास घनदाट जंगलातून अवघड चढण आहे. नंतर वेगळ्याच स्वरूपाचे जंगल लागते, एकदम घनदाट भले मोठे वृक्ष, धुके असे विलक्षण रूप दिसते. इथे पक्षी संपदा एवढी आहे की संपूर्ण जांगलातून वेग वेगळे पक्षी किलबिल करत असतात. पुढे ही वाट थेट शिखरावर जाते, जिथे तुम्हाला भीमाशंकर मंदिर दिसते.
दर्शन घेण्यासाठी ४-६ तास रांग लागली होती, पण आमच्या बरोबरील अजित पायगुडे होते त्यांची ओळख कामी आली आणि आमचे दर्शन २तासांत झाले.
हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही.
पुढे आम्ही गुप्त भीमाशंकर या स्थानाला भेट देणार होतो पण वेळे अभावी ते रद्द केले. वाटेत भीमा नदीचा उगम स्थान आहे तिथे भेट दिली आणि परतीचा प्रवास चालू केला.
या प्रवासात पाऊस कधीही आणि कमी अधिक प्रमाणात सतत पडत असतो, त्यामुळे तत्सम रेनकोट घ्या, छत्री नको, कारण डोंगरावर भरपूर वरा वाहत असतो, त्यामुळे तोल जाण्याची शक्यता आहे याची नोंद करा.
संपूर्ण ट्रेकमध्ये खाण्या पिण्यासाठी जागोजागी भरपूर छोटी हॉटेल उपलब्ध आहेत. पाणी पण आहे, जर जमत असेत तर झऱ्याचे पाणी पिऊ शकता.
ह्या व्हिडिओची लिंक खालील प्रमाणे दिली आहे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.
YouTube video link:
https://youtu.be/RZmis06fG5c
या मोहिमेत सहभागी झालेल्या समस्त ट्रेकर मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे ही मोहीम फत्ते झाली.
जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.
Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/
माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38
जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.
आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.
आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY
जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.
कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा