प्रवास आयुष्याचा, भाकरीचा चंद्र आणि मित्रांच्या शूभेच्छा
*🚩 सादर जय शिवराय 🚩* 🙏कुलस्वामिनी एकवीरा माता की जय🙏 नमस्कार मित्रांनो, आज १८ डिसेंबर माझा प्रकट दिवस, आई माऊलीची कृपा आपणा सगळ्यांवर राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏. आई माऊलीचा उदो उदो, एकवीरा माता की जय🙏 आपण दिलेल्या शुभेच्छा संदेशाबद्दल मी मित्रपरिवाराचा आभारी आहे. आयुष्याची सफर ही ऐका नदीच्या प्रवाहा प्रमाणे असते, जन्म झाला की नभातून क्षणात आपण भूतलावर येतो पावसाच्या थेंबाप्रमाणे, मग नशीब चांगले असेल तर मोठ्या पर्वतावर म्हणजे आपल्या आई वडिलांच्या आयुष्यात आपण आनंदाची उधळण करत येतो, नभांगण प्रफुल्लित होते त्या परिवाराचे, सगळी पृथ्वीवरील मरगळ, धुळवड स्वच्छ होते. जणू पृथ्वी हर्ष उल्हासित होते तशीच काही स्थीती आपल्या घरातील मंडळींची असते. मग आपला आयुष्याचा प्रवास ऐका छोट्या झऱ्या प्रमाणे चालू होतो. जसा वेळ जातो तो झरा आणि आपणही वाढत जातो. पुढे आपण आई वडिलांच्या आंगा खांद्यावर खेळतो जसे झरे दऱ्या खोऱ्यातून नाद करत उसळून आयुष्याकडे धाव घेत असतात. हाच तो क्षण जो फक्त आपल्या निरागस पणे आयुष्य जगण्याचा असतो. कारण जसे पुढे जाऊ, तसा काळ घात करायला उभा असतो, मतलबी स्वार्थी, यांत्रिकी आणि अ...