One Day Picnic Spot Near Mumbai, श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान, बारवी धरण बर्ड व्ह्यू पॉइंट
नमस्कार मंडळी🙏 यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट मंडळी आजची (२२ जानेवारी) फिरस्ती जरा वेगळीच होती, कारण होते आरवचा वाढदिवस. नेहमी मॉल मध्ये, गडावर जाऊन मुलांना त्याचा कंटाळा येतो, म्हणुच आपण वेगवेगळे रविवार वेगवेगळ्या ठिकाणी साजरे करतो. आज आम्ही ठरवले की आपल्या आरावचा वाढदिवस हा अखंड महाराष्ट्राचे दैवत अशा खंडोबाच्या मंदिरात मूळगावी जाऊन आशीर्वाद घ्यायचा आणि निसर्गाच्या सानिध्यात साजरा करायचा. सकाळी लवकर उठून तयारी केली आणि बोरिवली वरून ७.३० वाजता घर सोडले. प्रचंड थंडी होती त्यातच आम्ही बदलापूर ला जायचे ठरवले. गाडीत थंडीचा कडाका अजिबात कळात नव्हता. सकाळचे रम्य वातावरण आणि धुक्यात हरवलेले हिरवे डोंगर, त्यातच तुडुंब भरून वाहणाऱ्या बरवी नदीचे खोरे अधून मधून विलोभनीय दिसत होते होते. आम्ही ९ वाजता श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान, मुळगाव इथे पोहोचलो. वाहन ठेवायला भरपूर जागा आहे त्यामुळे चिंता नव्हती. बरं इथे सार्वजनिक वाहनाने यायचे असेल तर बदलापूर स्थानक गाठा, पुढे रिक्षा उपलब्ध आहेत, बहुदा २०० रुपयांमध्ये आपण येऊ शकता, पण रिक्षा चालकास परत जाण्यासाठी इथेच थांबवा जाण्याचे वेगळे पैसे लागत...