पोस्ट्स

बहुचर्चित असा KP धबधबा, खोपोलीच्या डोंगरात रेल्वे ब्रीज पल्याड आपल्याला उघड्या डोळ्यांनीसुद्धा दिसतो.

नमस्कार मंडळी🙏 KP धबधबा हा फार कमी वेळातच प्रसीद्धिच्या झोतात आला आहे. मला पण तो खुणावत होता. आपण कधी ना कधी काही कारणास्तव लोणावळा, खंडाळा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर किंवा त्यापलीकडील प्रभगास रेल्वेने भेट देतो तेव्हा खोपोली मधील या धबधब्याचे दर्शन परतीच्या प्रवासात अगदी जवळून होते. तसा तो खोपोली लोकल मधून पण अगदी ठळकपणे समोरच्या डोंगरात आपल्याला दिसतो. दिमागात उभा असलेला हा धबधबा असंख्य मंडळींना वेड लाऊन जातो नुसतेच मुंबईतून नाही तर संपूर्ण भारतातून पर्यटक इथला रस्ता शोधून पावसाळ्यात भेट देत असतात. या धबधब्याला भेट देण्यापूर्वी आमच्या TTMM ग्रुपला सक्त तकित दिली होती की ट्रेकिंग शूज आणि फुल पँट सक्तीचे आहे. कारण इथले जंगल घनदाट आहे अगदी झाडे, झुडपे आणि गवत सारखे अंगाला घासून जाते, थेट १० ते १५ फूट पर्यंत वाढलेलं आहे. काही ठिकाणी चालण्याची वाट सुधा दिसत नाही. अशा ठिकाणी साप असल्याची शक्यता अधिकच बळावते. आम्ही पहाटेची पहिली खोपोली लोकल पकडुन खोपोली गाठून पायथ्याचे गाव ठाकूरवाडी मधील दत्त मंदिर या ठिकाणी भेटलो. आमचे ट्रेकर मित्र काही मुंबईतून, तर काही थेट पुण्यातून आले होतो, आमची...

झेनिथ धबधबा, खोपोलीच्या कुशीत लपलेला, महाकाय जलप्रपोत ओकणारा आक्राळ विक्राळ धबधबा

नमस्कार मंडळी🙏 महाराष्ट्रातील बहुतेक धबधबे पावसाळ्यात कार्यरत असतात म्हणून त्यांची मजा वेळीस घेतलेली बरी. आम्ही TTMM तत्वावर खोपोलीतील झेनित धबधब्याला भेट देण्याचे ठरवले. पहाटे ३ वाजता उठून आम्ही दादर वरून ४.४८ची पहिली खोपोली लोकल पकडली जीने आम्हाला ७.१०ला खोपोलीमध्ये पोहोचवले. पुढे गावातील लोकांशी पोलिस नाहीत याची खातरजमा केली आणि पुढे मार्गस्थ झालो. आम्ही कृष्णा व्हॅली या हौसिंग कॉलोनीच्या गेटच्या बाजूंनी अरुंद वाटेने नदीच्या पत्रात येऊन पोहोचलो. थोडे चालल्यानंतर गावातील स्त्रिया कपडे भांडी धुताना दिसल्या, त्यांच्याकडून रस्त्याची माहिती घेतली आणि पुढे मार्गस्थ झालो. वाटेत नदि रुपी ओहळ दोन ते तीन ठिकाणी ओलांडावा लागतो. नंतर दाट असे अरण्य चालू होते, मला भीती होती सापांची पण ऐकाचेही दर्शन झाले नाही. पण इथली वन्य संपदा भरपूर आहे, भरपूर पक्षी शिळ घालत होते आणि माणूस जसा मोठाली शिट्टी मरतो अगदी तस्सा. हिरवाईने नटलेला निसर्ग त्यामागे दिसणारा सह्याद्री आणि त्याच्या खांद्यावरील असंख्य असे धबधबे. हे सगळे बघून मन प्रसन्न झाले. जसे धबधब्याजवळ जात होतो, जल प्रपोताचा आवाज तीव्र होत होता...

"सखे-सोबती" ग्रुप ची पावसाळी सहल, चोंडे गावातील घाटघर धबधबा

नमस्कार मंडळी🙏 सखे सोबती या ग्रुपची सहल दर वर्षी पावसाळ्यात असते, त्यांचे महाविद्यालयातील सगळे मित्र मैत्रिणी यानिमित्ताने वर्षातून एकदा तरी भेटत असतात. आम्ही पण त्यात जसा वेळ मिळेल तसे सहभागी होतो. हे माझे तिसरे वर्ष त्यांच्या सोबत पावसाळी सहल अनुभवायचे. ही सहल TTMM याच मुद्द्यावर आधारित असते अगदी वाजवी खर्चात सगळ्यांना परवडेल अशा बजेट मध्ये ती आखलेली असते, ही या सहलीईची विशेषता. आम्ही सकाळी ६ वाजता आमचा प्रवास प्रायव्हेट बसने बोरिवली इथून सुरू केला. प्रवासात आमच्या मनोरंजनाची सोय इस्तंभुत केली होती, आमच्या मित्रमंडळाचे होतकरू गायक आपली गाण्याची लकब कराओके music सोबत गाण्याच्या भेंड्यानसोबत सादर करत होते. त्यातच काही मंडळी गाण्याच्या तालावर डान्सचा ठेका धरत होते. प्रवास एकदम सुखकर होत होता. अशातच वाशिंद ला पोहोचलो कळलेच नाही. वाटेत वशिंद इथे आम्हाला नाश्ता आणि चहा यांची सोय केली होती. सुंदर हिरवळीने भरलेल्या कुरणा समोर पण रस्त्यालगत गरम गरम चहा आणि कांदापोहे असा फक्कड नाश्ता झाला, जरा नजर वर केली तर क्षितिजावर वजीर सुळका आणि त्यामागे माहुली किल्ला दिसत होता, मनोहारी दृश्य होते ते...

पन्हाळा ते पावनखिंड मोहीम, ही मोहीम नुसती भ्रमंतीचीसाठी नव्हती तर मावळा बनून अंतर्मुख होऊन जगण्यासाठी होतीनमस्कार मंडळी🙏

पन्हाळा ते पावनखिंड मोहीम, ही मोहीम नुसती भ्रमंतीचीसाठी नव्हती तर मावळा बनून अंतर्मुख होऊन जगण्यासाठी होती. नमस्कार मंडळी🙏 जय शिवराय🚩 हर हर महादेव, जय शिवशंकर बरेच वर्ष ईच्छा होती पण ती पूर्ण होत नव्हती, शेवटी ऑफबीट ट्रेकर्सचे पुणे येथील श्री शरद बाचुटे यांनी ग्रुप वर मेसेज पाठवला, आम्ही जाणार आहोत, कोण येणार असेल तर कळवा, तेव्हा फोन वर बोलून घतले आणि मला पण येण्याची ईच्छा आहे असे कळवले. तेव्हा ते बोलले जरूर या. त्यावेळी मुंबईतून मी एकटा होतो, बरोबर कोणी नव्हते म्हणून मनावर थोडे दडपण होते. ऑफबीट ट्रेकर्स म्हणजे तुफान सिंहगड एक्स्प्रेस आणि आपण मुंबई लोकल हे गणित जुळणारे नव्हते तरीदेखील प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मी तयार झालो. भर पावसात हा ट्रेक करायचा म्हणजे फार विचार करायला लागतो, दोन दिवसाचे कपडे, झोपायचे सामान, प्रथमोपचार औषध आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे जळू. सगळी तयारी झाली पण जळुशी सामना कसा करायचा. या विषयावर अभ्यास चालू झाला आणि लागणाऱ्या बचावाच्या युक्त्या, वस्तू औषध यांची तयारी पण झाली. बा रायगड परिवार या संस्थेने ही मोहीम आखली होती आणि ती देखील मुंबई ते मुंबई म्हणून ...

श्री क्षेत्र भिमाशंकर, कर्जत, खांडस, गणेश घाट मार्गे घाट वाट ट्रेक

नमस्कार मंडळी🙏 हर हर महादेव, जय शिवशंकर हा ट्रेक आम्ही Simple Lifestyle Vlogs यांच्या "बोरिवली हायकर्स" या संघटनेने TTMM तत्वावर केला, वाजवी खर्चात म्हणजे अवघ्या २६७ रूपयात हा ट्रेक झाला, बोरिवली वरून सलग २५ तास प्रवास, ४०९२५ पावले आणि २८.६ किलोमीटर ची चाल असा भन्नाट होता. या प्रवासात ९ ट्रेक मेंबर्स होते, काही जुने तर काही नवे, सगळे मुंबईतून वेगवेळ्या ठिकाणा वरून आले होते. पण सगळ्यांची साथ महत्वाची होती. सगळ्यांनी न डगमगता हा कठीण असा ट्रेक रेकॉर्ड तोड टाईम आणि खर्चात पूर्ण केला हे महत्वाचे. TTMM या तत्वात फार अडचणी असतात, खर्चाचे बजेट कमी असते, ट्रेक फुकट असतो म्हणून लोक ऐन वेळेवर टांग पण देतात. पण मुश्किल तिथे होते जिथे आपण खाजगी वाहन बुक करतो आणि जर कोणी आले नाही तर भुर्दंड आपल्याला पडतो. असो पण यावरही आपण तोडगा काढला आहे, चिंता नसावी. यापुढे आपण तो दोष दूर करून प्रवास सुखाचा करू. आम्ही ९ जण होते म्हणून दोन खाजगी गाड्या केल्या आणि माणशी खर्च विभागून घेतला त्यामुळे बरे झाले. पार्किंग साठी आम्हाला पैसे मोजावे लागले नाहीतर अगदी शेवटी पार्किंग फुकट होते याची नोंद घ्याव...

स्वर्गरुपी धुक्यात हरवलेला श्री मलंग गड, कल्याण

स्वर्गरुपी धुक्यात हरवलेला श्री मलंग गड, कल्याण 🚩🚩जय शिवराय🚩🚩 🙏नमस्कार मंडळी🙏 पावसाळ्यातील आमचा हा पहिलाच ट्रेक तो ही ३२०० फूट उंचीचा. उन्हाळ्यात फिरस्ती चांगलीच झाली पण उंच आणि लांब पल्ल्याचे गड किल्ले प्रकर्षाने टाळले होते. आम्ही ऐका ग्रुप बरोबर ताहुलि या डोंगरावर जाणार होतो पण कल्याण मध्ये सकाळी वेळेत ६ वाजता पोहोचून सुध्दा मलंग गडाची बस मिळाली नाही. टॅक्सी मध्ये माणसे नव्हती, ऐकूण KDTC चा सावळा गोंधळ, आमचा दीड तास बस शोधण्यात फुकट गेला, असो. आम्ही ज्यांच्या बरोबर जाणार होतो त्यांना सांगितले की तुम्ही तुमचा ट्रेक करा, आम्ही बघतो जमले तर तुम्हाला जॉईन करतो. परंतु उशीर झाल्यामुळे आणि ताहुलीचा रस्ता माहिती नव्हता म्हणून आम्ही कळवले की आम्ही नाही येत आहोत आणि त्याच बस मधून मलंग गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आम्ही ८.३० पर्यंत मलंग गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. एसटी डेपोच्या उजव्या बाजूने प्रशस्त पायऱ्यांची वाट सिमेंट काँक्रिट मध्ये बनवली आहे, तिला धरून चाल सुरू केली. वाटेत चांगल्या पायऱ्या आहेत, वाटेच्या दुतर्फा भरपूर दुकान आहेत. रस्त्यात माकडे भरपूर आहेत ती नेहमी त्रास देतात,...

भर उन्ह्याळ्यात गर्द झाडांमध्ये लपलेला असा श्री महालक्ष्मी गड सुळका आणि त्यावरील महालक्ष्मी मातेचे स्वयंभू मंदिर, डहाणू

नमस्कार मंडळी🙏 तुम्हाला आत्तापर्यंत कळून चुकले असेल की भर उन्ह्याळ्यात आम्ही "ओपन टू स्काय" असे  ट्रेक करत नाहीत, आम्ही उन्हाचा त्रास कमी होईल अशा ट्रेक किंवा तत्सम जागेच्या शोधात नेहमीच असतो. जर आपल्याकडे काही जागा असतील तर त्याचा तपशील आम्हाला खालील दिलेल्या मोबाईलवर व्हॉटस् अप मेसेजद्वारे कळवावा. भरपूर अभ्यास केल्यानंतर आम्हाला गर्द झाडांमध्ये लपलेला असा श्री महालक्ष्मी गड सुळका आणि त्यावरील मूळ मंदिर यांचा शोध लागला. आमच्या Simple Lifestyle Vlogs ट्रेकिंग ग्रुपचे सहकारी श्री संदीप महाले हे डहाणूचे स्थानिक आहेत, यांनी इस्थंभूत माहिती पुरवली, मग सगळी आखणी करून आम्ही TTMM संकल्पनेच्या आधारावर हा ट्रेक करायचा असे ठरवले. महालक्ष्मी गड हा डहाणू स्थित रानशेत या गावात स्थित आहे. इथे पोहोचण्यासाठी आम्ही मुंबईवरून डहाणूची पहिली लोकल पकडली आणि डहाणूला पोहोचलो. पुढे थोड्या दुरीवरील डहाणू एसटी डेपो आहे, तिथून चारोटी नाक्यावर जाण्यासाठी भरपूर बस आहेत. बस पकडुन आम्ही रानशेत, महालक्ष्मी गड या थांब्यावर उतरलो. रानशेत थांब्यावरून चालत चालत आम्ही गडाचा पायथा गाठला. वाटेतच आम्हाला ताडीच...