पोस्ट्स

श्री गगनगिरी महाराज मठ, मनोरी

नमस्कार मंडळी, आजची सफर एक अध्यात्मिक स्थानाला भेट देण्यासाठी आखली होती, श्री गगनगिरी महाराज मठ, मनोरी हे गाव तसे मुंबई जवळचेच आहे पण सोयी सुविधांपासून आणि शहरिकरणा पसून अजून अवगत झाले नाही. कारण ह्या गावाला पोहोचण्यासाठी रस्त्यानं भाईंदर येथून जाता येते पण ते सोयीस्कर होत नाही, मालाड इथून मर्वे समुद्र किनारा इथून बोटीने मनोरी या गावात पोहोचता येते. हा सफर अगदी रंजक आहे, अगदी मोजकी माणसे, बोटीचा प्रवास आणि ऐका अनोख्या गावात प्रवेश. इथे बहुतेक कोळी समाजाची माणसे राहतात, मुख्य व्यवसाय माशेमारी, शेती, आणि आता गरजेनुसार रिसॉर्ट हा व्यवसाय फोफावताना दिसतो आहे. मनोरी गावातून मठाला जाण्यासाठी 1 किलोमीटर चालत रस्त्याने किंवा रिक्षाने जाऊ शकता. हा सगळा परिसर जंगल सदृश्य आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. मठात पोहचताच तिथे मोफत गाडी पार्किंगची व्यवस्था आहे, एक छोटे हॉटेल देखील आहे, चहा नाश्ता उपलब्ध होऊ शकतो. मठातील ऐका जागेवर गगनगिरी महाराजांची मोठी प्रतिमा स्थापन केलेली आहे, इथे त्यांची पूजा अर्चना केली जाते. समोरच. हवन कुंड आहे, इथे सत्संग आणि हवन नियमित होत असते. आज मात्र फक्त आम्...

"दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड परिक्रमा" छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली अनोखी मानवंदना

"दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड परिक्रमा" छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली अनोखी मानवंदना नमस्कार मंडळी, रायगड परिक्रमा ही भरपूर ट्रेकर मित्रांच्या अनुभवातून समजली होती, पण ती करण्याचा योग येत नव्हता, शेवटी आमचे ट्रेकर मित्र श्री शरद बचूटे यांनी एक दिवस सकाळी सकाळी फोन केला, STF ने रायगड परिक्रमा मोहीम आखली आहे, मी लगेच तारीख बघितली आणि घरातून अनुमती घेतली, कारण या मोहिमेसाठी जवळ जवळ 24 तास लागणार होते, मुंबई ते मुंबई असे. STF हा ग्रुप माझ्यासाठी नवीन होता, नाव भरपूर गाजलेले पण, कोण आयोजित करतो, कसे संपर्क करायचे हे माहिती नव्हते, शेवटी श्री संदीप कुथवळ यांच्याशी संपर्क केला आणि मोहीमेला येतो हे कन्फर्म केले. तसे संदीप सरांबरोबर आधी एक ट्रेक झाला होता, पण तसा परिचय मोजकाच होता,असो. पुढे जायचे कसे, कुठे भेटायाचे हे गणित जुळत नव्हते, तेव्हा STF ने ठरवलेला मीटिंग पॉइंट हा निजामपूर गावातून जात होते, माणगाव पुढे 10 किलोमीटर. ट्रेकर मंडळींनी भरपूर शोधाशोध करून सांगितले की बोरिवली ते उंबरडी एसटी बस आहे, रात्री 12 वाजता ती सकाळी 6-7 दरम्यान निजामपूर गाठेल. मुंबई वरून आम्ही तीन जण होतो...

मुंबई वरून केलेला जुन्नर प्रवास आणि पुढे हटकेश्वर ते लेण्याद्री केलेला रेंज ट्रेक "ऑफ बीट ट्रेकर" सोबत

नमस्कार मंडळी, हा ट्रेक आम्ही नोव्हेंबर महिन्यातच केला होता, पण काही कारणामुळे आपण त्यानंतर केलेले व्हिडिओ आधी रिलीज केले आणि मग तब्बेतीच्या कारणास्तव मी व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो एडिटिंग मध्ये उशीर केला. आपले अजून भरपूर व्हिडिओ येतील, पण तब्बेतीमुळे थोडा अजून वेळ लागणार आहे, त्याबद्दल क्षमस्व 🙏 ऑफ बीट ट्रेकर्सने हटकेश्वर ते लेण्याद्री असा ट्रेक करायचा असे ठरवले होते, ते पुण्याहून आणि मी मुंबईतून येणार असे ठरले. हा ट्रेक आम्ही TTMM या तत्त्वावर केला होता. सोबत कोणी येते का असे आमच्या TTMM ट्रेक ग्रुप पर विचारले असता उदासीनता दिसली, असो हे चालायचेच. कसे जायचे याचा विचार आणि अभ्यास झाला. सल्ला मासलत झाली, भरपूर जणांनी ग्रुप वर माहिती दिली. शेवटी मी आणि सुजित यांनी मुंबई सेंट्रल वरून रात्री शेवटची जुन्नर एसटी बस १२ च्या सुमारास आहे, ती पकडुन सकाळी जुन्नरला ७ वाजता पोहोचलो. एसटी उशिराच पोहोचली कारण बोरघाट १ तास बंद होता.  तिथून लेण्याद्री साठी थेट बस नाही पण लेण्याद्री फाट्यावर जाण्यासाठी बस आहे ती पकडली, पुढे २-३ km साठी आम्हाला लिफ्ट मिळाली ती पकडुन लेण्याद्री डोंगराखाली पोहोचलो. वात...

यादव कालीन शिरगाव किल्ल्याची सफर

नमस्कार मंडळी🙏 शिरगाव हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही, कारण शिरगाव हे नाव महाराष्ट्रातील भरपूर गावांचे आढळते. पण आज आपण भेट देणार आहोत ती पालघर मधील सातपाटी गाव जवळील एका समृद्ध गावाला. पालघर जिल्ह्यातील, शिरगाव हे गाव समुद्र किनारी वसलेले आहे, इथे बहुतेक बागायती शेती केली जाते, नारळी फोफळी, केळी, दुधी, अळू, कांदे, भात शेती हा प्रामुख्याने केलेला व्यवसाय. ह्या जागेचे भौगोलिक आणि सागरी वैशिष्ट बघून देवगिरीच्या यादवांनी इस १२२५ साली बांधला, पण नंतर हा किल्ला भरपूर राजवटींच्या अधिपत्याखाली राहिला आणि जशी राजवट तशी किल्ल्याची सौरचना बदलली गेली, सगळ्यात शेवटी हा किल्ला इंग्रजांनी वापरला होता आणि त्यात गरजेनुसार बदल केले गेले. किल्ल्याचे वैशिट्य हे की इथे बहुमजली इमारती होत्या, आत्ता फक्त ढासळलेले अवशेष बाकी आहेत. या किल्ल्यात एक दुर्मिळ तोफ सुस्थितीत आढळते. किल्ल्यात त्याकाळातील एक सौच कुप पण आढळतो. इथे पोर्तुगीज लोकांचा वावर होता आणि त्याकाळात साऊथ आफ्रिका देशातून आणलेला वेडा माड ह्या किल्ल्यात आणि अजू बाजूला त्याची उत्पत्ती झालेले आढळते. ह्या किल्ल्याला ५ बुरुज असून त्यात एक बुरुज हा अष्ट...

जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरण

जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरण नमस्कार मंडळी🙏 मागच्या भागात आपण श्री क्षेत्र सोमनाथ आणि वेरावल यात्रेबद्दल सविस्तर माहिती मिळवली आणि आज आपण वेरावल येथून रात्री ११ वाजता जुनागढसाठीच्या प्रवासाला सुरुवात केली. जुनागढ रेल्वे स्थानकात आपण १ वाजता पोहोचलो, इथे भयाण शांतता होती, आम्हीच चौघे जण ट्रेन मधून उतरलो, अगदी रामसेंच्या सिनेमात दाखवतात तसे, रामसेच्या सिनेमा मध्ये जसे भुटिया स्थानक असते तसे, कारण इथे बहुतेक सगळी मंडळी दिवसा प्रवास करून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याच्या तलेटी गावासाठी रिक्षा मिळाली. तलेटी मध्ये पोहोचल्यावर मोठी पंचाईत झाली, आपण ठरवलेल्या हॉटेल मध्ये जागा उपलब्ध नव्हती. रात्री १.३० वाजता हॉटेलची शोधाशोध सुरू झाली. सगळी हॉटेल, धर्मशाळा, आखाडे पालथे घातले पण कुठेही जागा शिल्लक नव्हती. शेवटी एक हॉटेल मालक शेवटची शिल्लक रूम विकण्याच्या प्रतीक्षेत होता, मी जाताच क्षणी तो बोलला शेवटची रूम आहे, लवकर नक्की करा, मी रूम बघून येई पर्यंत दुरे गिऱ्हाईक समोर तयार होते, मी रूम नक्की केली, ...

संपूर्ण सोमनाथ दर्शन

संपूर्ण सोमनाथ दर्शन, श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग, त्रिवेणी संगम, सूर्य मंदीर, पांडव गुंफा, गीता मंदिर, गोलोक धाम, शारदापीठ, भालकातिर्थ, बाणगंगा, अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले सोमनाथ मंदिर आणि रात्रीचा सोमनाथ मंदिरातील लेझर शो अशी एका दिवसात केलेली भटकंती नमस्कार मंडळी🙏 गेली एक वर्ष मनात विचार चालला होता की आपण गुरू शिखर गिरनारला भेट द्यावी पण तो योग जुळून येत नव्हता. शेवटी दिवाळीचे औचित्य साधून आम्ही ते नक्की केले आणि १५ नोव्हेंबर साठी तिकीट काढले ते होते जुनागड साठी, तिकीट ३ महिने आधी काढले तरी RAC च होते तरीही आम्ही प्रवास करायचा असे ठरवले. आम्ही सगळी तयारी केली होती, बॅगा बांधून घेतल्या. प्रवास कसा आणि कुठे कुठे फिरायचे ते ठरवले होते, त्यानुसार गिरुशिखर गिरनार पर्वत आणि संपूर्ण जुनागढ फिरायचे असे ठरले. १४ तारखेला पहाटे ३ वाजता मनात विचार आला की एवढे जवळ जात आहोत तर मग सोमनाथ ज्योति्लिंगांचे दर्शन का करू नये? मग घरातल्या मंडळींना उठऊन आणि बोलून आम्ही ५ वाजता नक्की केले की सोमनाथ दर्शन पण करायचे. लागलीच त्याच ट्रेनचे पुढील एक्स्टेन्शन रिझर्व्हेशन केले. वेरावल एक्सप्रेस किंवा सौराष्ट्...

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील तिसरा टप्पा अहुपे ते भीमाशंकर

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील तिसरा टप्पा अहुपे ते भीमाशंकर नमस्कार मंडळी🙏 घाटवाटा ह्या अनादी कालापासून अस्तित्वात आहेत, त्या मी किंवा ह्यांनी किंवा त्यांनी शोधल्या ह्या भानगडीत न पडता आपण त्यांचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. जशी नामांकित किल्ल्यावर माणसांची तोबा गर्दी होते तसे इथे नसते, इथे फक्त गुर चारणारे गावकरी दिसतात आणि आमच्यासारखे खुळे ट्रेकर्स. काहींना वाट भेटते तर काही भरकटतात, थोडी भीती, थोडे नवीन शोधण्याचा एक कसोशीने केलेला प्रयत्न. ऑफबीट ट्रेकर्स ने आयोजीत केलेला ट्रेक हा २ दिवसांचा होता पण मी तो ३ दिवसांचा योजून केला कारण मला नाणेघाट हा ट्रेक वैशाखारे गावातून करायचा होता. माझा नाणेघाटात फसलेला ट्रेकचा किस्सा, आणि आंबोली ते अहुपे प्रवासवर्णन मी आधीच्या भागात प्रस्तुत केले आहे ते मी परत लिहून वेळ वाया घालत नाही. नाणेघाट ते आंबोली या ट्रेक बाबद् पण आधीच्या लेखात सविस्तर लिहिले आहे. पुढील लेख क्रमशः अहूपे गावातील रात्र भयानक होती, झोप झाली नाही, तो किस्सा मी माझ्या आधीच्या वर्णनात लिहिला आहे. पहाट झाली आम्ही प्रत:विधी आटोप...