पोस्ट्स

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची नमस्कार मंडळी, तांदूळवाडी गड हा तसा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा, मुंबई जवळ, अगदी हाकेच्या अंतरावरच आहे तो, कमी खर्चिक बाब असा अगदी 100 रुपयात आपला प्रवास खर्च भागून जातो. सकाळच्या 5.45 आणि 6 अशा लागोपाठ दोन लोकल गाड्या डहाणू कडे जातात, ज्या सफाळ्याला 7 वाजता पोहोचतात. सफाळा स्टेशन बाहेर पूर्वेकडे एसटी बस उभीच असते, एसटी आपल्याला 20 रुपयात हिरव्यागार छोट्याश्या घाटाची सफर घडऊन थेट गडाच्या पायथ्याशी सोडते. घाटातून गड दिसतो पण तो धुक्यात माखलेल्या अवस्थेत असतो. एक अद्भुत असा नजारा प्रवास करताना दिसतो. तांदूळवाडी स्टॉप वर उतरल्यावर प्रशस्त असा वाहनतळ जिल्हा परिषदेने केला आहे, तिथे पार्किंग फुकट आहे मग चिंता नाही. पार्किंग समोरच काही दुकाने आहेत मग अगदी निर्धास्त पणे गाडी ठेऊन जाऊ शकता. तांदूळवाडी गड तसा लहानच पण चहू बाजूने गर्द अशा सह्याद्रीतील झाडं झुडपांनी वेढलेला आहे. मुख्य गडावर जायला आपल्याला एक दोन छोटे डोंगर पार करावे लागतात. गड परिसरात भरपूर तलाव, धरणे, गर्द झाडी, खाडी परिसर, खाजणाचा परिसर असे सगळे पक्षी आणि वन्य प्राण्यांना उपयुक्त असा पोशिंदा असल्याम...

मी पावसाळ्यात अनुभवलेला अभूतपूर्व असा माळशेज घाट

मी पावसाळ्यात अनुभवलेला अभूतपूर्व असा माळशेज घाट नमस्कार मंडळी, पावसाची चाहूल लागली की धरणी माता जुनी कापड बदलून हिरवा शालू नेसते, ती खुलून येते, तिच्या अंगा खांद्यावर लव्हाळी लवलऊ लागतात...... जास्त काही लिहिण्यापेक्षा ज्येष्ठ कवियात्री शांता शेळके बाईंनी लिहिलेली समर्पक कविताच बघुयात, आला पाऊस मातीच्या वासांत ग मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग आभाळात आले, काळे काळे ढग धारा कोसळल्या, निवे तगमग धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥ कोसळल्या कश्या, सरीवर सरी थेंब थेंब करी नाच पाण्यावरी लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥ लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली वारा दंगा करी, जुइ शहारली, चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥ झाडांवरी मुके, पाखरांचे थवे वीज लालनिळी, कशी नाचे लवे तेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥ वीज कडाडतां, भय दाटे उरीं एकलि मी इथे, सखा राहे दुरी मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग ॥ ५ ॥ – शांता शेळके  या पावसासाठी माझे शब्द अपुरे पडतील असा साग्ररस या कवितेतून प्रतीत होतो. महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण म्हणजे भटक्यांची पंढरी. निसर्गाची हिरवाई, काळे सफेद ढग, धुके, काळे शार असे डोंगर, आणि त्या वरतून...

श्री केदारनाथ यात्रा भाग 1

नमस्कार मंडळी, श्री केदारनाथ यात्रा भाग 1 मे महिन्याच्या शेवटीआम्ही केदारनाथ यात्रेला गेलो होतो, त्याचे व्हिडिओ पोस्ट केले होते पण काही कारणास्तव फोटो पोस्ट करायचे राहून गेले होते. केदारनाथ ही टूर आम्ही श्री दीपक शेळके पुणे आमचे ट्रेकर मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. टूरची पूर्ण आखणी, नियोजन, एजंट, हॉटेल ही सगळी माहिती त्यांनी पुरविली होती, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार, त्याच माहितीच्या जोरावर आम्ही आमची TTMM टूरची आखणी केली होती. माहिती मिळाल्या प्रमाणे आम्ही डेहराडून एक्स्प्रेस किंवा हरिद्वार एक्स्प्रेस हीचे तिकीट 4 महिने आधीच बुक केले होते, तरी आमची 2 तिकीट RAC राहिली होती. म्हणूनच आपण सगळ्यात आधी ट्रेन तिकीट बुक करणे गरजेचे आहे. ज्या दिवशी (४ महिने आधी) सकाळी 8 वाजता तिकीट ऑनलाईन irctc च्या वेबसाईट किंवा ॲप वर उघडतात तेव्हा अवघ्या 5 ते 10 मिनिटात सगळी तिकीटे बुक होऊन संपून जातात याची नोंद घ्यावी. त्यामुळेच सगळ्यात आधी ट्रेन तिकीट बुक करा  बांद्रा ते हरिद्वार हा पल्ला पार करायला ट्रेनला 31 तास लागतात. तेव्हा आपण हा प्रवास ग्रूपने केलेलाच बरा, जर आपण एकटे गोलो तर फार प...

गोवर्धन इको वीलेज, गलतारे, वाडा, पालघर

नमस्कार मंडळी, आज आपण वेगळ्याच ठिकाणाला भेट देणार आहोत. Iskcon यांचे गोवर्धन इको विलेज ही आध्यात्म आणि पर्यटन यांना जोड देणारी संकल्पना काही वर्षांपूर्वी नावारूपाला आली, ही वास्तू 100 एकर जागेत पसरलेली आहे भरपूर मंदिरांची शृंखला, जंगल, नदी, विविध प्रकारची जंगली आणि शोभेची फुलझाडे, हॉटेल, योग, मेडिटेशन, आयुर्वेद या सर्वांचा मिलाप आढळतो आणि याच मुले तूर्त घडीला भरपूर प्रसिद्धीच्या झोतात आहे. या मंदिराच्या शृंखला बघण्यासाठी उभ्या महाराष्ट्रातूनच नाही तर जवळ पास असलेल्या राज्यातून देखील भाविक भेट देत असतात. सर्वप्रथम ही जागा पालघर जिल्ह्यात, गलतारे गावात, हमरापुर वाडा या तालुक्यात येते. मुंबई पासून अवघ्या 90 km अंतरावर आहे तर पालघर पासून 33 km अंतरावर आहे. इथे येण्यासाठी एसटी बसचा पर्याय सुधा उपलब्ध आहे, सकाळी 7 च्या दरम्यान पालघर गलतारे कल्याण अशी बस उपलब्ध आहे, हीच बस दुपारी 2च्या सुमारास परत फिरते. जर ही बस चुकली तर भरपूर एसटी बस आपल्याला हमरापुर हायवे ला सोडतात पुढे रिक्षा उपलब्ध आहेत. इथे प्रशस्थ असे फ्री पार्किंग उपलब्ध आहे, त्यामुळे चिंता नाही. इथे आल्या आल्या आपल्याला प्रथम खिचडीचा...

काळमांडवी धबधबा म्हणजे निसर्गाने सह्याद्रीला अष्टपैलू पाढून तयार केलेला पाचूचा लाख मोलाचा ऐवज, त्याची खरी किंमत सह्याद्रीत फिरणाऱ्या रांगड्या भटक्यालाच कळणार.

काळमांडवी धबधबा हा पालघर जील्हातील जव्हार या तालुक्यात येतो, इथे पोहोचण्यासाठी स्वतः ही गाडी हा सर्वोत्तम पर्याय, तरीपण इथे आपण एसटी बस पकडुन जव्हार आणि पुढे शिवाजी नगर इथे जाण्यासाठी एसटी किंवा जीपचा पर्याय घेऊ शकता. पालघर किंवा मुंबई वरून आपण विक्रमगड मार्गे यावे, साधारण पालघर वरून 90km तर मुंबई वरून 120km अंतरावर आहे. इथे रात्रीचा मुक्काम पण करता येतो पण स्वतः सगळ्या वस्तू बाळगाव्यात. इथे टेन्ट भाड्याने देखील उपलब्ध होतो. इथे 20 रुपये माणसी तिकीट घेतले जाते. पार्किंग साठी भरपूर जागा उपलब्ध आहे, त्याचे वाजवी पैसे आकारले जातात. Safety Jackets 100 भाडे तत्त्वावर उपलब्ध आहेत. जेवण आणि पणी याची सोय इथे गावकरी करतात. पण आपला डबा बरोबर असलेला उत्तम. इथे मुबलक प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात आहे त्या मुळे, धोका नाही, भांडण तंटा होत नाही. 10, 20, 40, 50 फूट अशा उंचीवरून पाण्यात उद्या देखील मारता येतात, नक्कीच आपल्या जिम्मेदारी वर, इथे अपघात सुद्धा होतात पण ते पोलिस सांभाळतात. येथील निसर्ग सौंदर्य भरपूर भन्नाट आहे, इथे इतर फिरण्यासारख्या जागा खालील प्रमाणे, 1) काळ मांडवी धबधबा 2) जय विलास राजवाड...

गावाळी म्हणजे काय ?

गावाळी म्हणजे काय ? गावाळी म्हणजे उत्तर कोकणातील प्रचलित प्रथा, गावदेवीचा उत्सव, मटणाचा प्रसाद, "केळवा-माहीम" ह्या विषयाचा एकही व्हिडिओ यूट्यूब वर किंवा माहिती फेसबुकवर उपलब्ध नाही म्हणून व्हिडिओ जरूर बघा आणि मजकूर पण नक्की वाचा. उत्तर कोकणातील एक प्रचलित प्रथा, जी अनादी काळापासून चालत आली आहे, काही गावांत अजून मोजक्या उत्साही प्रतिनिधींनी जिवंत ठेवली आहे तर काही निरुत्साही गावांत मृत झाली आहे. ह्या प्रथेत अंधश्रद्धा वैगरे काही नाही. आपण जे बकरे खाटीकाकडून कापून घेतो ते न कापता आपल्या गावातील ग्राम देवतेपुढे कापतो, एवढाच काय तो फरक. इथे कोणाचा जोर नाही, कुणाची जबरदस्ती नाही, ज्याला पटेल त्यानी यावे आणि ज्याला पटत नाही त्यांनी या उत्सवात भाग घेऊ नये हा साधा नियम. प्रत्येक गावाला ग्रामदैवत लाभलेले असते. काही गावात मोठी मंदिर तयार झाली आहेत. या ग्रामदेवतेची वर्षानुवर्ष पूजा करणे, सेवा करणे अशी कामे गावातील प्रमुख कुटुंबाकडे सोपवली आहेत. बहुतेक करून गावातील पाटीलच यांचा मान बाळगत आले आहेत, म्हणून या देवाच्या आजूबाजूची जमीन या कुटुंबाला दिलेली असते. जेणेकरून त्यांनी ती कसून पीक घ्...

घोडे पाणी नाळ आणि रिठ्याचे दार हे सह्याद्री पर्वत रांगेतील अत्यंत कठीण श्रेणीतील असे कोकण आणि देश यांना जोडणारी घाट वाट

नमस्कार मंडळी, मी घोडे पाणी नाळ ह्या जागेचे भरपूर फोटो आणि व्हिडिओ बघितले होते, ह्या ठिकाणावर जायची ईच्छा होती, पण मुंबईतून या जागी जाणारी ट्रेकर मंडळी फार कमी. मनात असंख्य ईच्छा आहेत, भरपूर किल्ले घाट वाटा यांचा अभ्यास झाला पण वेळेचे गणित जुळून येत नाही, म्हणून जाताच येत नाही. काही घाट वाटा किंवा किल्ले असे असतात की जर संधी मिळाली तर ती हुकउ नये, आणि काहीपण करून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा हे मनात ठरवलेलं, अशातूनच घोडे पाणी नाळ या घाट वाटेचे ऑफबीट ट्रेकर्स पुणे येथील संस्था प्रयोजन करत होती. मी पण नक्की केले की ही घाट वाट करायचीच. पण एकच समस्या होतो मुंबईतून कसे पोहोचायचे, कारण ट्रेक सकाळी 6 वाजता चालू करायचा होता आणि त्या जागी सार्वजनिक वाहन जात नाही. मग काय मुंबईच्या माहिती असलेल्या ट्रेकिंग ग्रुप वर विचारले पण कोणी तयार झाले नाही. आत्ता होती पंचाईत, मग ठरवले आपणच मुंबईतून कार घेऊंन निघावे पण मग कल्याण येथील Dr सुभाष पाठारी तयार झाले आणि त्यांच्याच गाडीतून कल्याण वरून रात्री प्रवास चालू केला. नियोजित टोकावडे गावी आम्ही रात्रीच पोहोचलो, पण पुण्याकडून येणारी मंडळी पोहोचल...