रेल्वे तिकीट खिडकी वरील झगडा, कोण बरोबर कोण चूक?
नमस्कार मित्रांनो, बरेच वर्षानंतर पालघर ते बोरीवली प्रवास करण्याचा मोका मिळाला. सकाळी लवकर ट्रेन पकडावी आणि ट्रेन चुकू नये म्हणून लवकर निघालो, तिकीट काऊंटर वर फार गर्दी होती, स्मार्ट कार्ड घरीच राहिले होते. साधारण माणसा प्रमाणे रांगे मधे उभे राहिलो. पण लगेच डोक्यात आले की नवीन स्मार्ट कार्ड घ्यावे म्हणून गर्दीचे काऊंटर सोडून रिकामी काऊंटर वर गेलो पण असे वाटले की मी माझ्या थोबाडीत मारून घेतली आहे. मी त्या इसमाला विचारले की स्मार्ट कार्ड कुठल्या खिडकी वर मिळते, त्या शुंभाचे उत्तर होते मला माहिती नाही! मी त्याच्या उत्तराने अवाक झालो. सगळ्या खिडक्या एका रांगेत होत्या, सगळे जण एकत्र बसले होतो तरीही हा व्यक्ती सरळ बोलोतो आहे की मला माहिती नाही, हे मला खटकले. मिंपण आवाज वाढवला, पण त्यावर बाजूची तिकीट देणारी बाई सुधा त्याच्याच आवाजात आवाज मिळूनच बोलू लागली. पण माझे बोलणे एवढेच होते की तुम्हाला माहिती नाही तर बाजूला बसलेल्या तुमच्या सहकारी व्यक्तीला विचारा आणि मग उत्तर द्या. एकाच विभागामध्ये काम करणारी माणसे तुम्हाला हे माहिती नाही का कुठच्या खिडकीवर काय काम चालते ते? असो मी परत रांगेत उभा राहि...